अल्बर्ट आईन्स्टाईन
आईन्स्टाईन यांचा जन्म १४ मार्च १८७९साली जर्मनीमध्ये झाला. पदार्थ विज्ञान हा त्यांचा आवडता विषय. ते जन्माने ज्यू धर्मीय होते. जर्मनीमध्ये ज्यू लोकांच्या होणाऱ्या छळाला कंटाळून त्यांनी मायदेश सोडून ते अमेरिकेत स्थायिक झाले. तेथे त्यांनी भौतिक संशोधनाला वाहून घेतले.
दुसऱ्या महायुद्धाचा शेवट अत्यंत भीषण झाला. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी अशा दोन मोठ्या शहरांवर अणुबाँब टाकले गेले. हजारो लोक प्राणाला मुकले, हजारो लोक अपंग झाले. जगातली ही एक भयंकर घटना होती. जगभर या घटनेचा निषेध झाला. निषेध करणाऱ्यांमध्ये अशी एक व्यक्ती होती, की जिने हे अणुबाँब बनविण्याचे समीकरण मांडले होते. माझ्या समीकरणाचे एवढे भयंकर, भीषण परिणाम होतील, अशी कल्पना माझ्या मनात आली असती तर हा शोध मी लावलाच नसता.’
हे समीकरण होते E=mc२. ही समीकरण मांडणारी व्यक्ती होती, की ज्यांच्याकडे सर्व जग आदराने पाहात होते. ते म्हणजे विज्ञानमहर्षी अल्बर्ट
आईन्स्टाईन. ते एक थोर शास्त्रज्ञ, गाढे विद्वान, विचारवंत आणि मानवतेचे महान पुजारी होते.
अल्बर्ट आईन्स्टाईन
या संशोधनात त्यांनी E=mc२’ हे समीकरण मांडले. या संशोधनाने संपूर्ण विश्वाकडे पाहण्याचे संशोधकांचे दृष्टिकोन बदलले. वस्तुमान आणि ऊर्जा या परस्पर रुपांतरणीय आहेत, हा त्यांच्या सिद्धांत त्या वेळच्या सिद्धांतांना मोडीत काढणारा होता.
त्या अर्थी वस्तुमान वेगाबरोबर वाढते. वेग हा गतिजन्य ऊर्जेचे रूप आहे. गतिमान पदार्थांचे वस्तुमान वाढत जाते. ते त्यातील ऊर्जेपासून येत असते. वस्तुमान कमी कमी करत नेले, तर त्यापासून ऊर्जा निर्माण करता येईल.
ज्यावेळी कणांचा वेग प्रकाशवेगाएवढा होतो, तेव्हा त्याचे वस्तुमान लोप पावते आणि त्याचे किरण बनतात. याचाच अर्थ, ते ऊर्जेचे रूप घेतात.
म्हणजेच ऊर्जा आणि वस्तुमान एकमेकात रूपांतरीत होऊ शकतात.
गतिमान पदार्थाचा वेग, त्याचे वस्तुमान, गतिजन्य ऊर्जा, स्थितिजन्य ऊर्जा, ऊर्जेच्या निरनिराळ्या रूपात बरोबर असणारे वस्तुमानाचे अस्तित्व, प्रकाशाचा वेग अशा अनेक घटकांचा परस्परसंबंध लक्षात घेऊन ऊर्जा =वस्तुमान x प्रकाशवेगाचा वर्ग हे समीकरण आईनस्टाईन नी मांडले. त्यांनी मांडलेल्या या समीकरणामुळे अणुक्रांतीचे नवे पर्व जगासमोर आले. कितीतरी अगम्य गोष्टींचा उलगडा या समीकरणामुळे झाला. अणूच्या गर्भात असणारा प्रचंड सुप्त ऊर्जेचा अंदाज याच समीकरणाने शक्य झाला. यातूनच विध्वंसक अशा अणुबाँबची निर्मिती झाली. आईनस्टाईन हे नेहमी आपल्या संशोधनात गर्क असत. फावला वेळ त्यांना कधीतरी मिळत असे. त्यांनी सुमारे तीनशेच्या वर शोधनिबंध प्रसिद्ध केले. १९२१ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आयुष्यात त्यांना पैशाचा मोह कधीच पडला नाही. खूप पैसा मिळाल्यावर त्यांनी अनेक धर्मादाय संस्थांना अनेक प्रकारे मदत करून मानवतेचा आदर्श घालून दिला. असे हे थोर शास्त्रज्ञ ! जगाला एक नवी दृष्टी त्यांनी दिली. माणुसकीची जोपासना केली. अखंडपणे संशोधन करणारे हे शास्त्रज्ञ १९५५ मध्ये स्वर्गवासी
झाले.