गणित विषयक नवोपक्रम
नवोपक्रमाचे शीर्षक .

चला पाढे पाठांतर करु या

शिक्षिकाचे नांव – श्रीमती लता भालचंद्र आराध्ये (तडकलकर)
प्रस्तावना:
गणित विषयामध्ये संख्येवरील क्रिया या क्षेत्रास सर्वात महत्वाचे स्थान असून यातील
गुणाकार व भागाकर या क्रिया सर्रास विद्यार्थ्यांना अवघडच वाटतात कारण या क्रिया पाढे
पाठंतरावरच अवलंबून असतात आपण वर्गामध्ये इयत्तेनुसार अत्यावश्यक असणारे पाढे
वारंवार पाठ करुन घेत असतो. सर्व विद्यार्थ्यांना एकसुरात चांगल्याप्रकारे म्हणता येतात.
पण वैयक्तिक म्हणण्यास सांगितले तर म्हणता येत नाही. एकदम पाढ्याचा टप्या विचारला
तर सांगता येत नाही, पाढे पाठ नसणे हा एक गणित विषयातील अध्ययन अध्यापन मधला
फार मोठा अडथळा आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पाढे पाठांतराचे महत्व लक्षात घेऊन
हा नवोपक्रम राबवणे अत्यावश्यक वाटले.
माझी शाळा नगरपरिषद कक्षेतील असल्यामुळे माझ्या शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे
आर्थिक मागास वर्गातीलच आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे वह्या, पाट्या यासारखी शैक्षणिक
साधने उपलब्ध नसतात. तसेच त्यांच्या घरातील व परिसरातील वातावरण अशैक्षणिक
असते. अभ्यासास पोषक असे वातावरण नसते. त्यामुळे ही मुले घरी अभ्यास करत नाहीत.
पालक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत मुलांची पाठांतर करण्याची तयारी नसते.
अशा मुलांना वैयक्तिक पाढे पाठ नसतात अशा मुलांचे पाढे पाठ होण्यासाठी हा उपक्रम
आयोजीत केला.
 नवोपक्रमाची माझी गरज:
विद्यार्थ्यांना पाढे पाठांतराची व त्यातून गणित विषयाबद्दलची आवड निर्माण होईल या
उपक्रमामुळे आनंददायी शिक्षणाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून अध्ययन-अध्यापन करणे
शक्य होईल. विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंदाने व सहजपणे पाढे पाठ करता येतील त्यामुळे
गणितातील विविध उदाहरणे सोडवणे सोपे जाईल. पालकांना विद्यार्थ्यांच्या पाढे
पाठांतरासाठी घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करण्यास प्रोत्साहन देता येईल.
सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना साधा बे चा पाढा येत नाही अशी समाजाकडून होणारी टीका
निश्चित टळेल व परस्परांविषयी आदर निर्माण होईल.
मी माझ्या वर्गातील प्रत्येक मुलीकडून पाढे म्हणवून घेतले तेव्हा माझ्या असे लक्षात
आले की वर्गातील ३०पर्यंतचे पाढे फक्त दोन मुलीना येतात १५ ते २५पर्यंत पादेव पाता
असणाऱ्या फक्त १८ मुली आहेत. तेव्हा मी मनाशी ठरवले की वर्गातील जास्तीत जास्ता
पाढे पाठांतर संख्याज्ञान हा गणिताचा पाया आहे. पाढे पाठांतरावर गणित विषयामध्ये
विद्यार्थीनीना पाढे पाठ झाले पाहिजेत कारण गणित विषयामध्ये पाढ्यांना खूप महत्व आहे.
संख्येवरील क्रिया या क्षेत्रास सर्वात महत्वाचे स्थान आहे. यातील गुणाकार व भागाकर या
क्रिया पाढे पाठांतरावरच अवलंबून आहे. व्यावहारिक उदाहरणे सोडवण्यासाठी पाठे
पाठांतराची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन मी पाढे पाठांतर हे क्षेत्र निवडले. विद्यार्थ्यांच्या
पूर्वज्ञानावर आधारीत पाढे पाठांतरावर आधारीत चाचणी घेतली व पाढे पाठांतर हे के
निश्चित केले.
पाढे पाठांतर नसल्याची काही कारणे माझ्या निदर्शनास आली ती पुढीलप्रमाणे
आहेत.
विद्यार्थ्यांना गणिताविषयी आवड कमी आहे.
पाढे पाठांतर अवघड व क्लिष्ट वाटते.
पाढे पाठांतरासाठी विविध उपक्रमाचे आयोजन प्रभावीपणे होत नाही.
पाढे पाठांतराचा सराव व दृढीकरण होत नाही.
पाठांतराच्या प्रभावी युक्त्या पाढे पाठांतरासाठी कमी प्रमाणात वापरल्या जातात.
पाढे पाठांतरासंबंधी पालकांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही.
पाढे निर्मिती व पाढे पाठांतरासाठी योग्य त्या शैक्षणिक साधनांचा वापर म्हणावा
तितका होत नाही.
म्हणून मी पाढे पाठांतर हे क्षेत्र वरील कारणासाठी निश्चित केले.
नवोपक्रमाची नवीनता:
(माझ्या उपक्रमाचे वेगळेपण कशात आहे)
१) जर आनंददायी शिक्षणाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला तर विविध उपक्रमांचा
वापर केला तर विद्यार्थ्यांचे पाढे हसतखेळत व सहज पाठ होतात.
२) विविध उपक्रम कौशल्यपूर्वक तयार करुन राबवले तर विद्यार्थ्यांच्या पाठातर
होऊन त्यांचे दृढीकरण होते.
३) पाढे पाठांतरासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर केला तर विद्यार्थ्यांच्या
पाठांतरातील उत्साह व आनंद वाढतो व त्याची अधिक प्रगती होते.
४) पाढे पाठांतरासाठी विविध मनोरंजक उपक्रम राबवले तर गणिताचे अध्यापन
करणाऱ्या शिक्षकाबद्दल आदर व गणित विषयाबद्दल आवड निर्माण होते.
५) पाठांतराच्या प्रभावी युक्त्याचा वापर केल्याने आनंददायी व कृतिशील
शिक्षणामुळे शाळेविषयाची आवड निर्माण होते.
६) विविध उपक्रमासाठी पाढे पाठांतर व दृढीकरण झाल्याने प्रत्यक्ष उदाहरणे
सोडवताना पाढ्यांचा योग्य वापर करतात.
नवोपक्रम घेण्यामागची माझी उद्दिष्टे :
१) विद्यार्थ्यांना ‘बे’ च्या पाढ्यापासून ३० च्या पाढ्यापर्यंत सर्व पाढे तोंडपाठ
होणेसाठी प्रयत्न करणे.
२) पाठ झालेल्या पाढ्यांचे दृढीकरण होण्यासाठी प्रयत्न करणे.
३) पाढे पाठांतराची विद्यार्थ्यांना सवय लावणे
४) पाढे पाठांतर व त्यांचे दृढीकरण यासाठी विविध उपक्रमांची नियोजनपूर्वक
अंमलबाजावणी करणे.
५) पाढ्यांवर विचारलेल्या गुणाकाराच्या स्वरुपातील व भागाकाराच्या स्वरुपातील
वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे देता येतील यासाठी प्रयत्न करणे.
६) गणित विषयाची भीती घालवणे.
७) पाढे पाठांतराच्या प्रभावी युक्त्यांचा वापर करणे.
८) गणिताचे अध्यापन आनंददायी करणे.
नवोपक्रमाचे नियोजन:
पाढे पाठांतराची आवश्यकता लक्षात घेऊन मी नगरपरिषद प्राथमिक मराठी मुलींची
शाळा नं. १ अक्कलकोट मधील इ. ४ थी च्या वर्गातील ४० विद्यार्थ्यांसाठी या नवोपक्रमाची
निवड केली.
उपक्रमासाठी लागणारा कालावधी पुढील प्रमाणे निश्चित केले.
नवोपक्रमाची कार्यवाही:
मी पाढे पाठंतराविषयी इ. ४ थी च्या वर्गातील ही समस्या प्रथम जाणून घेतली
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व शाळेतील सर्व सहकारी शिक्षक यांच्याशी चर्चा केली. तसेच
केंद्रप्रमुख व मा. प्रशासनाधिकारी यांच्याशीही चर्चा करुन मी पाढे पाठांतर हा नवोपक्रम
निवडून नवोपक्रमाचे नियोजन व कार्यवाही पुढील प्रमाणे सुरु केली.
१) पूर्वतयारी : प्रत्येक विद्यार्थ्यांचे पाढे पाठ आहेत का हे पाहण्यासाठी प्रत्येक
मुलीकडून पाढे म्हणवून घेतले. पाढ्यावर आधारीत गुणाकार व भागाकाराची
उदाहरणे सोडवून घेतली. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे पाढे पाठ नाहीत हे दिसून आले.
महिना १ व २ : सुरुवातीच्या दोन महिन्यात पाढे वैयक्तिक व सामुहिक म्हणवून
घेतले पाढे लेखनांचा सराव घेतला. विविध उपक्रमातून पाढे पाठांतर व पाट्यावर
आधारीत सोडवून घेतली. तरी परंतु काही मुलींचे पाढे पाठ नाहीत हे दिसून आले.
महिना ३ व ४:पहिल्या दोन महिन्याच्या सरावानंतर देखील विद्यार्थ्यांचे पाढे पाठ
नाहीत हे पाहून ज्यादा वेळ देऊन पालकांना सांगून त्यांचे सहकार्य घेऊन व ज्यादा
सराव देऊन पाढे पाठांतराचा सराव दिला उपक्रम घेतले स्पर्धा घेतल्या त्यामुळे
वर्गातील मुलींचे पाढे पाठांतर झाले.
शैक्षणिक साहित्य म्हणून पाढ्याचा तक्ता, अंककार्ड, संख्याकार्ड गोट्या, मण्या,
दशकाच्या माळा इत्यादी वापरले. नवोपक्रमासाठी लागणारे साहित्य विद्यार्थी
पाट्याचा तक्ता तयार करुन आणले व शाळेतील उपलब्ध साहित्य पाढ्याचा तका,
दशकाच्या माळा याचा वापर पाढे पाठांतरासाठी केला. तसेच संख्याकार्ड अंककार्ड
तयार केले.
उपक्रम-१
अध्यापन पद्धती : प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विश्लेषणात्मक पद्धती,
निरीक्षण पद्धती, सराव व स्वाध्याय पद्धती, प्रात्यक्षिक पद्धती, स्वयंअध्ययन पद्धती
वमूल्यमापन या पद्धतींचा वापर केला.
सहकार्य : पाढे पाठांतर प्रकल्पामध्ये विद्यार्थी, पालक, शाळेचे मुख्याध्यापक व
शाळेतील इतर सर्व शिक्षकांचे सहकार्य घेतले.
नवोपक्रमाची मांडणी : विद्यार्थ्यांचे पाढे पाठांतर होण्यासाठी पाढे पाठांतर स्पर्धाचे
आयोजन केले. विविध उपक्रम घेतले. प्रोत्साहनपर बक्षिस व शाबासकी दिली.
नवोपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही:
नवोपक्रम सुरु करण्यापूर्वी प्रथम वर्गातील ४० विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी घेतली. पाढे
पाठांतरामध्ये पाढ्यांच्या संख्येनुसार गट पाडून विद्यार्थी वर्गीकरण केले. पूर्व चाचणीमुळे
अप्रगत विद्यार्थी संख्या वर्गात आढळून आली.
पूर्व चाचणीनंतर या उपक्रमासाठी या नवोपक्रमाची निश्चिती केली त्यासाठी
आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य जमवले. नवोपक्रम राबवण्याच्या कालावधीत
पुढीलप्रमाणे उपक्रम राबवले.
पूर्वतयारी गीत
विद्यार्थी पाढे पाठांतरामध्ये टप्पेच चुकतात क्रमाने टप्पे म्हणता येत नाहीत. बहुतांश
विद्यार्थ्यांना याचा सराव कमी असल्यामुळे पाढे पाठांतराकडे दुर्लक्ष झाले होते. या टप्प्यांना
महत्वाचे स्थान असल्याने पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांकडून गाणे पाठांतर करुन घेतले. हे
गीत मला एका मासिकात मिळाले त्याचा मी या उपक्रमामध्ये उपयोग करुन घेतला.
error: Content is protected !!