तंबाखूचा नाद आरोग्याचा घात.
 या  जन्मावर या जगण्यावर
शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे.
या काव्यपंक्तीत कवी मंगेश पाडगावकरांनी जीवनाचा खोल अर्थ भरलेला
आहे. जीवन हे अनमोल आहे. मनुष्य जन्म एकदाच प्राप्त होतो. म्हणून त्याचा
विनियोग योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. म्हणूनच आपण आपल्या अंगी चांगल्या
सवयी लावणे गरजेचे आहे.
एखाद्या राष्ट्राची खरी ओळख काय? खरी संपत्ती कोणती? या प्रश्नाचे
उत्तर आहे, त्या राष्ट्राची नैसर्गिक साधनसंपत्ती व त्या राष्ट्राची जनताच त्यातल्या
त्यात तरूणपिढी. तरूणपिढी ही कमजोर, शक्तीहीन, दुबळी, अशिक्षितपणा किंवा
अल्पशिक्षित व व्यसनाधीन असेल तर ते राष्ट्रही कमजोर बनते, दुबळे बनते व जागतिक
स्पर्धेत मागे पडते, अविकासित म्हणून ओळखले जाते.
व्यसन हे लागते कसे? संसर्गजन्य रोग कसा पसरतो? तसेच या व्यसनाचे
देखील आहे. दूरदर्शनवरील जाहिराती, आकर्षक कागदातील पॅकिंग, सुवासिक गंध,
मित्रांचा दबाव, ताणतणाव, एकटेपणा, उत्सुकता, दुःखाची भावना, आनंद
उपभोगण्यासाठी, घरगुती समस्या तसेच फॅशनच्या नावाखाली अनेकजण तंबाखू
किंवा अन्य व्यसनाच्या आहारी जातात. भारताचे भावी आधारस्तंभ जर व्यसनाधीन
झाले तर देशाचे काय होणार? हे सांगणे न लगे. झाडाला लागलेली कीड, जेव्हा झाड
पूर्ण पोखरते, ते झाड उध्वस्त करते तेव्हाच शांत होते. अगदी त्याचप्रमाणे व्यसनाचे
असते. सर्व धर्माने आणि संस्कृत्यांमध्ये निषेध करण्यात आला आहे. परंतु सर्वच
धर्माने आणि संस्कृत्यांमध्ये धुम्रपानाला ममत्वाने जवळ करण्या आलेले दिसून येतात.
धूम्रपानाचे अनेक फतवे निघूनही तंबाखू कंपन्यांचे उत्पादन व त्यांचे ग्राहक यांच्या
संख्येत वाढच होत आहे. व अशा कंपन्या अत्यंत महागड्या जाहिराती करून युवक-
युवतींना आकर्षित करित आहेत. तंबाखू हा चटकन आणि प्रबळ व्यसन लागणारा
पदार्थ आहे. कागदाच्या नळीत गुंडाळलेली तंबाखूची पाने असे असलेली
सिगारेट आहे. सिगारेट मध्ये निकोटीनचे विष असते. सिगारेट, विडी चिरूट किंवा
जर्दा, पान, गुटखा इ. च्या माध्यमातून तंबाखूचे सेवन होते.
एकदा जडलेले व्यसन सुटणे फार अवघड आहे. लागलेले व्यसन माणसास
संपविते नाहीतर एक व्यसन सुटण्यासाठी दुसरे व्यसन जोडणारे महाभाग कमी नाहीत.
आपणाबरोबर इतरांना व्यसन लावणारे अनेक महाभाग आहेत. एकमेकांना देऊ व
त्या प्रसार करू ह्याप्रमाणे असतात. श्रीमंत वर्ग अनेक मेजवाण्यांचा आयोजन करतात.
त्यावेळी तेथे अन्नपदार्थाबरोबरच अनावश्यक गोष्टी म्हणजे मद्य, गुटखा, सिगारेट,
तंबाखू ठेवतात. त्यामुळे साहजिकच उत्सुकता व नावीन्य ह्या पायी व्यसन जडू शकते.
तंबाखू सारख्या व्यसनाचे परिणाम भयानक असतात. धुम्रपान करणे अत्यंत
वाईट आहे. आपण पहातो की साधा विस्तव केरकचरा, लाकूड जाळून टाकतो. परंतु
निकोटीन सारख्या विषाच्या सोबतीला असेलला विस्तव जो धूम्रपान शौकीन तोंडात
बाळगून श्वासाद्वारे पोटात, नाकात घेतात. तो पोटात गेल्यावर जळण्याची क्रिया
केल्यावाचून गप्प बसणार आहे काय?
व्यसन ज्याच्या निवासी । तो होतो कैलासवासी ।।
अलीकडे अनेक मुले लहान वयातच व्यसनाधीन होतात. मुंबई मधील आठवी ते
दहावी या वर्गातील २८% मुले तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन करतात. केरळमधील एक
महिला कॉलेजमधील पाहणीत असे आढळून आले की १० ते २० % मुली पानमसाला
खात होत्या. तंबाखूमध्ये अनेक प्रकारचे घातक घटक आहेत. त्यामध्ये निकोटीनं हे
मुख्य उत्तेजक द्रव्य असते. तंबाखूतील ४३८ घटक कर्करोगास व इतर आजारास
कारणीभूत होतात.
तंबाखू जन्य धुम्रपानांमुळे स्मरण शक्तीवर परिणाम होतो. मनास अस्थिर
झाल्यासारखे वाटते. त्वचा, हृदय यावर वाईट परिणाम होतो. तंबाखूमधील विषद्रव्ये
शरीरात साचत राहून पुढे शरीर यंत्रणा खराब करतात. थकवा नाहिसा झाल्यासारखा
वाटून उत्साह येतोय परंतु हे सर्व आभासी व भावनात्मक असते. पुढेपुढे धूम्रपान
आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाशिवाय मनाला चैन पडत नाही यालाच तंबाखूचे
व्यसन म्हणतात. तंबाखूच्या व्यसनाने काही कालावधीनंतर घसा; अन्ननलिका, जठर,
स्वरयंत्र, श्वसनलिका, फुफ्फुस इ. अवयवांचा कर्करोग उद्भवण्याची दाट शक्यता
असते. तसेच पचनसंस्थेचे (उदा. जठरदाह, जठरव्रण, पेप्टीकव्रण) हृदय व
रक्ताभिसरण संस्थेचे (उदा. उच्चरक्त, हृदयरोहिणी, आकुंचण विकार) दातांचे (उदा.
दाढ किडणे), मूत्र व प्रजनन संस्थेचे (उदा. पुरूषांच्या वीर्यामधील शुक्रपेशींची संख्या
कमी होणे) आदी आजार होऊ शकतात. मुलींना तंबाखूमुळे वंध्यत्व येऊ शकते.
मुख दुर्गंधी जाणवते, तंबाखू एक गोड विष आहे. ज्याप्रमाणे दिव्यातील जळालेल्या
वातीची काजळी तयार होते त्याचप्रमाणे संशोधकांनी तंबाखू जाळून त्याच्या धुराची
काजळी एकत्र केली व ती अनेक निरोगी उंदरांच्या शरीराला फासली. परिणामी बरेच
उंदीर तात्काळ मरण पावले. या प्रयोगाने सिद्ध होते की तंबाखूचा धूर शरीरासाठी
किती घातक आहे.
गुरूनानक साहेबांनी म्हटले आहे की, तंबाखू एवढी अपवित्र वस्तू आहे की
मानवास दानव बनवते. तंबाखूच्या शेतात गाय तर काय गाढवसुद्धा जात नाही. तंबाखू
निर्माण होत आहेत. तंबाखू खाणारे इतस्त्र सतत धुंकत असतात. त्यामुळे अस्वच्छतेचा
सारख्या व्यसनाने कळत नकळत अनेक सामाजिक आर्थिक आणि प्रदूषणाचे प्रश्न
प्रश्न निर्माण होतो.
करा होळी व्यसनाची । रंगत वाढेल जीवनाची ।।
तंबाखू मनापासून सोडण्याचा निश्चय प्रबळ असेल तर व्यसनमुक्तीचा मार्ग सापडतो.
व्यसनी लोकांचे संकल्प बळ अधिक असणे गरजेचे आहे. तंबाखूचे सेवन हा मुलांचा
आजार समजला जातो. कारण बहुतेक धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी किंवा तंबाखूचे
सेवन करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या बालपणीच या वाईट सवयींची सुरूवात केलेली
असते. म्हणून या व्यसनावर प्रतिबंधात्मक उपाय लहान वयातच सुरू व्हायला हवेत.
या घातक व्यसनापासून भावी पिढीचे रक्षण करणे जरूरीचे आहे. यासाठी पालकांना
खूप मेहनत घ्यायला हवी. तसेच मुलींनी देखील जबाबदारीने वागायला हवे. मुलांना
वाईट सवयी जडू नयेत म्हणून पालकांनी दक्ष रहायला हवे. ज्या मुलांना तंबाखूचे
व्यसन नाही, अशांना या व्यसनापासून दूर ठेवायला हवे.
विविध प्रकारचे उपयोगी छंद जोपासावेत. व्यसनाधिन व्यक्तींचा
मेळावा.त्यातून त्यांच्या समस्या, उपचार, निराकरण, वैद्यकीय सुविधा पुरविण्यात
याव्यात. शाळा, महाविद्यालये यामधून विद्यार्थ्यावर त्यांच्या मनावर संस्काराचे रोपण
करून व्यसनाचे तोटे, दुर्धर परिणाम समस्यांचे निराकरण करून तरूण पिढी
व्यसनापासून कशी दूर राहिल याविषयी मार्गदर्शन व प्रबोधन व्हावयास हवे. तंबाखूच्या
संदर्भातील कायद्याचे नीट पालन होणे गरजेचे आहे. तंबाखूयुक्त पदार्थांवर आणि
वस्तूंवर जास्त कर आकारला तर खरेदी कमी होऊ शकेल. तसेच तंबाखूजन्य
पदार्थांच्या जाहिरातीवर निर्बंध आणून या व्यसनाला आळा घालता येईल. सर्वांनीच
तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहण्यास मदत करावी.
व्यसनांना द्या पूर्णविराम । वयाला द्या स्वल्पविराम ।।
error: Content is protected !!