Table of Contents
पाऊस
पाऊस
दिनू शाळेतून घरी निघाला होता. आकाशात काळे ढग जमा झाले होते. थोड्या
वेळातच पावसाला सुरुवात झाली. आकाशातून पाण्याचे थेंब खाली येत होते. दिनूला
त्याची गंमत वाटली.
दिनूने थेंबाला विचारले, “थेंबा थेंबा, जरा माझ्याशी बोल.’ थेंब म्हणाला,
‘काय रे दिनू?’ दिनू म्हणाला, “तू आकाशातून उंचावरून येतोस हे दिसले मला;
पण तू आकाशात गेलास कसा ते काही कळले नाही मला!”
थेंब म्हणाला, “अरे खूप ऊन पडले, की आम्ही खूप खूप तापतो, आमची वाफ
होते, वाफ हलकी हलकी असते. ती वर वर आकाशात जाते. मग वाफेचे ढग तयार
होतात आणि ढगाला गारगार वारा लागतो, मग आम्ही खाली येतो, तुम्हांला पाणी
यायला. नदी, नाले, तळी भरायला.”
पाऊस
टेस्ट मध्ये किती गुण मिळाले हे समजण्यासाठी VIEW SCORE ला क्लिक करा
टेस्ट मधील चुकलेले उत्तरे पहां टेस्ट सोडवल्या बद्दल APPULKI/appulki team आपली
आभारी आहे.