व्यक्तिमत्व विषयक नवोपक्रम
 नवोपक्रमाचे शीर्षक

“बालमंचाद्वारे व्यक्तीमत्व विकास”

शिक्षकाचे नांव : विजयकुमार नागनाथ सलगर
.शप्रस्तावना:
शाळा म्हणजे मुलांना घडविणारे एक मंदिरच आहे. व या मंदिरातील पुजारी म्हणजे
शिक्षक होय. देशाच्या भावी पिढीला घडवण्याचे महत्वाचे काम या शिक्षकाला करावे लागते.
शाळेत फक्त अध्ययन-अध्यापन एवढीच प्रक्रिया अपेक्षित नाही. तर मुलांना घडवण्यासाठी
त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सहशालेय उपक्रम राबवणे आवश्यक आहे. यासाठी
मुलांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करुन देणे आवश्यक आहे. हे सर्व करत असताना भाषा हा
घटकसुद्धा महत्वाचा ठरतो. त्यातल्या त्यात जर अमराठी भाषेचा भाग असेल तर तिथे
बोलीभाषेचा पगडा विद्यार्थ्यांवर असल्याने त्यांचा भाषिक विकास होण्यास अडचणी निर्माण
होतात. अध्यापनातील हा सर्वांत मोठा अडथळा आहे. भाषेवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी
विद्यार्थ्यांना त्या त्या इयत्तेच्या क्षमता प्राप्त होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भाषा
विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी शाळेमध्ये मुलांना एक व्यासपीठ निर्माण करुन देऊन
याद्वारे विविध उपक्रम कार्यक्रमाचे शाळेत आयोजन करणे आवश्यक ठरते. भाषेवर प्रभुत्व
येण्यासाठी विद्यार्थ्यांची शब्द संपदा वाढविण्यासाठी असे उपक्रम मोलाची भूमिका
बजावतात. शाळेमध्ये स्वतंत्ररित्या मुलांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करुन दिल्याने
त्यांच्या बुद्धी व तर्कशक्तीला वाव मिळेल. त्यांच्यातील सुप्त गुणांना उजाळा मिळून त्यांच्या
विकासास हातभार लागेल. सद्य परिस्थितीला शिक्षणात वेगवेगळे विचार प्रवाह, नवनवीन
तंत्रांचा समावेश होत आहे. क्षमताधिष्टीत अभ्यासक्रम, सातत्यपूर्ण मूल्यमापन, आनंददायी व
विद्यार्थी केंद्रित अध्यापन या द्वारा विद्यार्थी घडवला जात आहे. सर्वांगीण विकास, मूलभूत
क्षमता विकास नैतिक, शिक्षण, तंत्रशिक्षण या बाबी शिक्षणाच्या व्याख्येशी जोडल्या जात
आहेत. अशावेळी ग्रामीण भागातील तशातच अमराठी भागातील विद्यार्थी अशा गोष्टींना सामोरे
जाऊ शकेल का ? सध्याच्या स्पर्धात्मक युगात तो तरु शकेल का ? सदरहु उपक्रम सादर
करताना अशीच एक उणीव जाणवली. आमच्या शाळेतील मुले कोणत्याही कार्यक्रमात भाग
घेत नव्हती. एखादा उपक्रम शाळेत राबवावा म्हणजे त्याला पुरेसे प्रतिसाद मिळत नव्हता.
मुलांना समोर व्यासपीठावर जाऊन बोलायला भीती वाटायची. त्यातच बोलीभाषेतील एखादा
शब्द बोलण्यात (भाषण करताना) आला की, मुले हसायची यामुळे स्पर्धात कार्यक्रमात
कुणीच सहभागी होत नव्हते. तेंव्हा मुलांच्या मनातील न्यूनगंड दूर सारुन त्यांच्यात
आत्मविश्वास निर्माण करावा. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र मंच निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प
हाती घेतला.
पार्श्वभूमी
हा प्रकल्प राबवण्याच्या अगोदरच्या गोष्टी विचारात घ्यावयाच्या म्हणजे मी जेंव्हा या
शाळेत सुरुवातीला आलो. तेंव्हा शाळेची व आजूबाजूची परिस्थिती खरोखरच वाईट अशी
होती. विशेषत: माझ्या शाळेचा परिसर हा कन्नड भाषा बोलणारा असल्याने मराठी भाषा
बोलणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. बोलीभाषेचा प्रचंड पगडा येथील
लोकांवर व मुलांवर होता. मुले वर्गात विचारलेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरे काही बोलीभाषेचे शब्द
वापरुनच देत. फारच कमी विद्यार्थी मराठीचा वापर करत होते. मराठीच्या तासाला तर
पूर्वज्ञानजागृतीवर एखादा प्रश्न विचारल्यावर मुलांना उत्तर देता येत नव्हते. काही मुले
काहीतरी उत्तर द्यावे या हेतूने बोलत तेंव्हा फारच घाबरत होते.
या सर्व गोष्टींचा जेंव्हा मी विचार केला तेंव्हा मी यायच्या अगोदर या शाळेची स्थिती
कशी होती हे जाणून घेण्याच्या प्रयत्न केला. तेंव्हा असे समजले की, ही शाळा
तालुक्यापासून लांब व जाण्यायेण्याची सोय व्यवस्थित नसल्याने कुणीही शिक्षक या शाळेत
यावयास तयार होत नसे. आला तरी तो टिकत नसे. अशा परिस्थितीत प्रशासकीय बदली
झालेले शिक्षक या शाळेवर टाकले जात असत. हे शिक्षक या शाळेवर एखादा कार्यक्रम,
उपक्रम घ्यावा मुलांचा विकास व्हावा या उत्साहाने कार्य करत नव्हते. पुढे जाऊन असे
समजले की या शाळेत परिपाठ परिणामकारक घेतला जात नव्हता. अधिकारी वर्गसुद्धा या
शाळेकडे भेटीसाठी जास्त येत नसल्यामुळे शाळेची फारच हेळसांड होत होती. परिणामी या
शाळेतील मुले कित्येक चांगल्या गोष्टीपासून वंचित राहिली.
मी जेंव्हा सर्वप्रथम या शाळेत गेलो होतो तेंव्हा दुसऱ्या दिवशी परिपाठाच्या तासाला
आज शाळेत काहीतरी वेगळे होत आहे असे विद्यार्थ्यांना वाटत असल्याचे मला जाणवले.
परिपाठाला मुलांची उपस्थिती फारच कमी होती. मी काही मुलांना सुविचार, बोधकथा,
सांगण्याचे आवाहन केले. तेंव्हा कुणीच समोर आले नाही. मी मुलांसमोर वर्तमान पत्रातील
सुविचार व बोधकथा सांगण्याचे आवाहन केले. तेंव्हा एक विद्यार्थी पुढे आला. त्याने वाचन
केले परंतु तो वाचताना इतका घाबरत होता की, त्याचे पाय कापताना मला दिसले. काही
मुले, मुली (त्यातल्या त्यात वरच्या वर्गातील) घरकाम, शेतीकाम करुन येत या मुलांना
परिपाठाला नेहमी उशीर व्हायचा. मी या शाळेत डिसेंबर महिन्यात रुजू झालो होतो. जानेवारी
अशी मुलांनी उत्तरे दिली.
महिन्यात होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात फारच कमी मुलांनी सहभाग घेतला.
तुम्ही या कार्यक्रमात का सहभागी होत नाही असे विचारले असता, आम्हाला भिती वाटते,
तेंव्हा मुलांमध्ये शिस्त यावी, धाडस निर्माण व्हावे, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा
यासाठी हा नवोपक्रम हाती घेण्याचा मी निश्चय केला.
नवोपक्रम घेण्याची गरज
जेंव्हा मी शाळेमध्ये रुजू झालो तेंव्हा शाळेची परिस्थिती फारच बिकट अशा
स्वरुपाची होती. बोलीभाषेचा फार मोठा पगडा माझ्या विद्यार्थ्यांवर आहे. त्यांना मराठी
बोलता यावे, यामुळे मुले उत्साहाने अनेक कार्यक्रमात भाग घेतील असा विचार माझ्या मनात
आला. कोणतीच मुले स्वत:हून कार्यक्रमात भाग घेत नसत. तेंव्हा जर या मुलांना आपण एक
व्यासपीठ निर्माण करुन दिले तर मुले खरोखर पुढे भविष्यात चकमतील असा आशावाद मला
होता.
हा नवोपक्रम हाती घ्यायचे आणखी एक कारण म्हणजे माझ्या आयुष्यातील एक
आठवण देणारी घटना आहे. मी पहिली ते बारावी पर्यंत ज्या शाळेत शिकलो तिथे मला कधीच
व्यासपीठावर जाऊन बोलण्याची अथवा एखादी कृती करुन दाखवण्याची संधी मला मिळाली
नव्हती. मला सतत भीती वाटायची. कधी कधी मनात विचार यायचा आपले शिक्षक
आपल्याला कधीच का भाषणासाठी निवडत नाहीत ? सांस्कृतिक कार्यक्रमात का घेत
नाहीत? ठरलेले मुलेंच सारखी पुढे पुढे असायची. मी बारावीला असताना अचानक मला हिंदी
दिन साजरा करण्यासाठी सूत्रसंचालक म्हणून निवडण्यात आले. (दि.१४-९-१९९७)
मला सूत्रसंचालन करावयाचे म्हणजे काय करायचे? कसे करायचे? काय बोलायचे याबाबत
विशेष कल्पना नव्हती. या कार्यक्रमास संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथील हिंदी विभागाचे
प्राध्यापक श्री. इरेशजी स्वामी सर आले होते. (माजी कुलगुरु, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)
जेंव्हा कार्यक्रम सुरु झाला तेंव्हा मी “आज हम यहाँ हिंदी दिन मनाने के लिए इकठ्ठा हुए है।”
असे म्हणालो. यावेळी भरपूर चुका माझ्या हातून झाल्या. फार मोठे पाप केल्यासारखे मला
वाटले. मी खूपच नाराज झालो. त्याचदिवशी मी ठरवले याच्यापुढे आयुष्यात कधीच भाषण
करायचे नाही. परंतु पुढे डी. एड, ला गेल्यावर माझ्यात आत्मविश्वास निर्माण झला. मी
कित्येक स्पर्धांत बक्षीससुद्धा मिळवले. तेंव्हा माझ्यासारखी स्थिती माझ्या विद्यार्थ्यांची होऊ
नये यासाठी मी मुलांसाठी स्वतंत्र मंच, व्यासपीठ निर्माण करावयाचे ठरवले.
दुसरे कारण म्हणजे माझ्या शाळेतून अद्याप पर्यंत कुणीच तालुकास्तर व
जिल्हास्तरावरील निबंध, हस्ताक्षर, वक्तृत्व, कथाकथन स्पर्धेत सहभागी झाले नव्हते.
माझ्या शाळेतील मुलेही स्पर्धेत सहभागी व्हावीत, बक्षीसे मिळवावीत, या हेतूने मी हा
नवोपक्रम हाती घेतला.
 नवोपक्रमाची उद्दिष्टे :-
या नवोपक्रमाची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत.
विद्यार्थ्यांमधील न्यूनगंडदूर करुन आत्मविश्वास निर्माण करणे,
 विद्यार्थ्यांचा शाळेबद्दलचा सकारात्मक दृष्टीकोन वाढवून सहकार्य मिळवणे.
विविध उपक्रमातून कृतीयुक्त शिक्षण देणे.
विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या पोषक आंतरक्रिया घडवून आणणे.
 समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून विद्यार्थ्यांचा मनाची जडण-घडण करणे.
विद्यार्थ्यातील चुकांचे एकत्रीकरण करुन उपाययोजना करणे.
शालेय दिनक्रमात विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त सहभाग मिळवणे.
विद्यार्थ्यांची निरीक्षणवृत्ती, शोधकवृत्ती वाढीस लावणे,
 उपक्रमाच्या परिणामकारकतेचा पडताळा पाहणे.
पक्रमाचे नियोजन:
या नवोपक्रमाचे नियोजन करत असताना अगोदर कोणत्या इयत्तांच्या विद्यार्थ्यासाठी
ही उपक्रम घ्यायचा हे निश्चित केले. या प्रकल्पासाठी इयत्ता ३ री ते ७ वी चे विद्यार्थी
निवडले यानंतर या प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्वावर पुढील कालावधी निवडला.
कालावधी १ जून २००४ ते १ ऑक्टोबर २००४
या पाच महिन्याच्या कालावधीत कोणत्या महिन्यात कोणत्या स्पर्धा आयोजित
करावयाचे याचे अगोदर नियोजन करुन घेतले. नंतर मुलांचा प्रतिसाद किती आहे? त्यांच्या
भाव-भावना तसेच या प्रकल्पाबाबत त्यांचा सहभाग कितपत मिळेल? हे जाणून घेण्यासाठी
प्रश्नावली तयार केली ती प्रश्नावली खालीलप्रमाणे आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रतिसादासाठी प्रश्नावली बनवली. यानंतर मुलांना कार्यक्रम कसे
सादर करतात हे दाखवण्यासाठी काही उपक्रम स्वत: सादर करायचे निश्चित केले तर काही
उपक्रम व स्पर्धा कशा चालतात हे दाखवण्यासाठी मी शहरातून कॅसेट व सी. डी. प्लेअर्स
एका गावकऱ्याच्या मदतीने मुलांना दाखवण्याचे ठरवले. यानंतर वर्गवार व शाळेमध्ये विद्यार्थी
मंडळ स्थापन करुन प्रतिनिधीची निवड केली व त्यांना त्यांच्या कामाची माहिती करुन दिली.
शाळेत स्थापन केलेल्या बालमंचच्या उद्घाटनासाठी आमच्याच केंद्रातील एका उपक्रमशील
शिक्षकांना आमंत्रीत केले. यासाठी शाळेतच एक शोकेस जो अडगळीत पडला होता त्याला
स्वच्छ करुन अगोदर स्वत:च्या हस्ताक्षरातच एक भित्तीपत्रक तयार केले. अशाप्रकारे
प्रकल्पाच्याअगोदर नियोजन केले.
नवोपक्रमाची कार्यवाही
दि.१-६-२००४ रोजी आपल्या शाळेत आज काहीतरी वेगळेच होणार आहे.
आपले गुरुजी आपल्यासाठी काहीतरी नवीन करणार आहेत. या उत्सुक ते पोटी काही मुले
वकरच शाळेत आली होती. मी भित्तीपत्रीकेला उद्घाटनासाठी रंगीत कागद, रिबीन
लावलेले पाहून काही पालकही आज शाळेत काय आहे. असे उत्सुकतेपोटी विचारत होते.
परिपाठाच्या वेळेसच आमच्या गावातील मोठ्या शाळेतील उपक्रमशील शिक्षकाच्या
हस्ते या भित्तीपत्रीकेचे उद्घाटन केले व आजपासून या शाळेत तुमच्यासाठी एक विशेष अशी
स्वरूपाचे व्यासपीठ, मंच सुरु केल्याचे जाहीर केले. यावेळेस कुणीही घाबरणे, मला जमणार
नाही म्हणून माघार घेऊ नये, असे ठामपणे सांगितले. तुम्हाला यातून आनंदचं मिळणार
आहे. तुमची शाळा सुधारणार आहे, असे उद्गार उद्घाटनास आलेल्या शिक्षकांनी काढले.
कोणत्या दिवशी कोणते उपक्रम होणार आहेत हे पूर्वीच नियोजन करुन ठेवल्याने
त्यानुसार प्रकल्पास सुरुवात झाली. मुलांना थोडाफार अनुभव यावा माहिती मिळावी यासाठी
इतर शाळेतील कार्यक्रमाचे फोटो मुलांना आणून दाखवले. असे फोटो पाहून मुलांनाही
आश्चर्य वाटले. त्यांनीही गुरुजी आपण हे करु असे मला म्हणू लागले. यानंतर मी वर्गवार व
शाळावार जे विद्यार्थी मंडळ स्थापिले होते. त्यांना त्यांची कामे वाटून दिली. आपल्याला
मिळालेल्या पदानुसार मुलेही कामे करु लागली. मुलांना विविध नियोजनात अगोदर सोपी,
मनोरंजात्मक उपक्रम, स्पर्धा घेतल्या कथाकथन कसे करावे? निबंध कसा लिहावा ?
प्रश्नमंजुषा स्पर्धा कशी घेतली जाते ? इ. बाबत मार्गदर्शन केले. मुलांसमोर मी स्वत:
कथाकथन, नाट्यीकरण करुन दाखवले ? टेपच्याद्वारे काही भाषणे, गाणी, मुलांना ऐकवली
शाळेत टी.व्ही. नसल्याने एका गावकऱ्याच्या घरी जाऊन “खेल-खेल में बदलो दुनिया” हा
पर्यावरणावर आधारित दूरदर्शनवरील कार्यक्रम दाखवला. हे सर्व करत असताना मुलांचे मी
निरीक्षण करत होतो. यानंतर मी मुलांसमोर प्रश्नावली ठेऊन वैयक्तिक प्रत्येक मुलास समोर
बोलावून प्रश्न विचारले व नोंदी घेतल्या यात अनेक विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड असल्याचे
दिसून आले. अशावेळी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन कार्यक्रमात सहभागी
होण्यास प्रोत्साहन दिले. अनेक वेळा मुलांसमोर निबंधाचे चांगले नमुने आणून दाखवले.
रेडिओवरील संवादनाटिका ऐकवल्या. या सर्व घटनांमुळे शाळेमध्ये वेगळेच वातावरण तयार
होऊ लागले. ठरलेल्या नियोजनानुसार कार्यक्रम होत होते. त्या कार्यक्रमात स्पर्धात यशस्वी झाला
error: Content is protected !!